Sunday, 30 September 2012

गणपती विसर्जन झाले ...आता पुण्याच्या प्रत्येक नदी काठी, कॅनाल्स जवळ,तळया काठी दिसतील ते 'न विरघळलेले प्लास्टर ऑफ परीस चे गणपती आणि भरपूर निर्माल्याच्या प्लास्टिक च्या पिशव्या '.
मी पुण्याच्या  नऱ्हे ह्या भागात राहते,इथून जवळ असलेल्या पुणे-बंगलोर बाय पासच्या  कात्रज च्या तळ्यावर संध्याकाळी ५ वाजता मी घरच्यान सोबत गणपती विसर्जना साठी गेलेले. तिथे जाऊन अतिशय  मानसिक त्रास आणि संताप अनावर झाला. ह्या तळ्याच्या काठावर संपूर्णतः निर्माल्याच्या मोठ्या,छोट्या  प्लास्टिक च्या पिशव्या अश्या काही पसरलेल्या आहेत जणू काही प्लास्टिक ची शेतीच आहे ती. काही  महाभागांना तर मी  माझ्या समोर  आरडा ओरडा करत पिशव्या फेकताना पहिले.कधी अक्काला येणार ह्या मूर्खाना? कित्येक पर्यावर संघ जीवाचा आकांत करून सांगतात कि शाडूचे गणपती घ्या, निर्माल्या पाण्यात फेकू नका ..पण तरीही हि अक्कालाहीन लोक तेच करतात.
मुळात ह्यांच्या अक्कालेची एवढी कुवतच नाही हेच खरे! महानगर पालिकेच्या नावाने फक्त ओरडा करायचा परंतु स्वतः मात्र सगळीकडे घाण पसरवत फिरायचे आणि स्वतःला गल्लीचे भाई म्हणून मिरवत, माज  मारत फिरायचा एवढीच काय ती ह्यांना अक्कल. ह्यांच्या साठी बाकी पर्यावरण गेले तेल लावत.
तुम्ही आत्ताही जाऊ बघाल तर कोणत्याही सुज्ञांचा संताप झाल्या वाचून राहणार नाही. ह्यावर ठोसे उपाय केले पाहिजे हे मान्य पण अश्या लोकांच्या मानसिकता कश्या बदलणार ?

No comments:

Post a Comment